Miss universe 2021 : देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताची हरनाझ कौर संधूच्या डोक्यावर  Miss Universe 2021चा ताज ठेवण्यात आला. भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे. 


तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.


हरनाझ संधूच्या आधी दोन भारतीय महिलांनी Miss Universe चा मान पटकावला. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं नाव मोठं केलं.



1994 मध्ये सुष्मिता सेननं पहिल्यांदा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. तर 2000 मध्ये लारा दत्तानं मिस युनिव्हर्स किताब पटकावला. तर आता तब्बल 21 वर्षांनंतर हरनाझ संधू विश्व सुंदरी होण्याचा मान पटकावला आहे. 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या घरी आणणारी सुष्मिता सेन पहिली भारतीय होती.