मुंबई : दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला  तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे. तुम्हाला ही  उत्सुकता असेलच की, असं काय गिफ्ट आहे की ज्यामुळे नम्रताचा यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. ८  डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात  योगेश संभेराव म्हणजेच नम्रताचा नवरा एका छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे.  आता रील लाईफमध्ये  हे कपल  एकत्र झळकणार असल्याने  रिअल टू रील  हा प्रवास  नम्रताला विशेष आनंद देणारा आहे यात शंका नाही.   
 
८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी,डॉ.झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम,विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने,सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठीफौज चित्रपटात  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली घरची माणसं आपला आधारस्तंभ असतात. आनंदाच्या, दुःखाच्या, यश-अपयशाच्या कोणत्याही प्रसंगात कुटुंबाची साथ-सोबत असेल तर अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी साध्य करता येतात. एकमेकांशी असलेले रुसवे-फुगवे आणि छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमधून हसत खेळत गमतीदार आयुष्य जगणारं असंच एक भन्नाट फुलंब्रीकर कुटुंब लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. या कुटुंबाची आणि त्यांच्या नात्यातील गंमत अनुभवायची असेल तर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' हा चित्रपट तुम्हाला पाहावा लागेल. 


हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता ,पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. 'एकदा येऊन तर बघा' आता २४ नोव्हेंबर ऐवजी  ८ डिसेंबरला  तुमच्या भेटीला येणार आहे . आता प्रेक्षकांना या चित्रपटाची मेजवानी ८ डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन घेता येईल.