मुंबई: बॉलिवूड अभिनेता बोमन ईरानी पून्हा एकदा आजोबा झाले आहेत. त्यांचा मुलगा दानिश आणि सून रिया दोघांना कन्या रत्न प्राप्त झाले आहे. आजोबा बोमन यांनी ही गोड बातमी शुक्रवारी चाहत्यांना ट्विटरच्या माध्यमातून दिली. बोमन यांनी दानिश आणि रिया यांचा एक फोटो ट्विटर पोस्ट केला आहे. बोमन यांचा मुलगा दानिश आणि रिया 2011 साली विवाह बंधणात अडकले होते. त्यांनी 2016 साली त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. बोमन यांचा दुसरा मुलगा केयोज ईरानी बॉलिवूड अभिनेता आहे. 'स्टूडेंट ऑफ द ईयर' आणि 'यंगिस्तान' यांसारख्या सिनेमात त्याने अभिनय केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


2019 मध्ये बोमन ईरानींचे अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. सुशांत सिंग राजपूतचा सिनेमा 'ड्राइव', राजकुमार रावचा 'मेड इन चायना' त्याचप्रमाने तामिळ सिनेमा 'काप्पान' आणि मल्टीस्टारर सिनेमा 'हाउसफुल-4', 'टोटल धमाल' सिनेमात झळकणार आहेत. तर यांपैकी कोणता सिनेमा बॉक्सऑफिसवर किती मजल मारेल हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.


2020 मध्ये बोमन यांचा डॉन-3 सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकणार असून सिनेमात आणखी कलकार कोण असतील यावर काणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.