मुंबई : मिस युनिव्हर्स 2021चा किताब मेक्सिकोच्या एंड्रिया मेजाला मिळाला. त्याचबरोबर मिस इंडिया अ‍ॅडलिन कॅसलिनोने पहिल्या चारमध्ये स्थान मिळवलं. मिस युनिव्हर्स ही पदवी जिंकणारी सुष्मिता सेन ही पहिली भारतीय होती. त्यानंतर, सन 2000 मध्ये, लारा दत्ताने हा किताब आपल्या नावावर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1994मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकलं. मिस युनिव्हर्सचे विजेतेपद जिंकल्यानंतर सुष्मिता सेनने बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केलं. 'आर्या' या वेब सीरिजमध्ये ती अखेर दिसली होती.


1994मध्ये मिस युनिव्हर्सच्या स्टेजवर सुष्मिता सेनला शेवटचा प्रश्न विचारण्यात आला होता - 'एक स्त्री असल्याचा अर्थ काय आहे आणि काय वाटत?' यावर सुष्मिताने उत्तर दिलं की, 'एक स्त्री होणं ही देवाची देणगी आहे ज्याची आपण सर्वांनी प्रशंसा केली पाहिजे आणि तिचं कौतुक केलं पाहिजे. मूल एका आईपासून जन्माला येतं. ती ही एक स्त्री असते.'


हरवला होता पासपोर्ट
सुष्मिता सेनने तिच्या उत्तरात म्हटलं होतं की, 'बाई एका पुरुषाला शिकवते, काळजी कशी घ्यायची आणि प्रेम कसं करायचं हे सगळं एक स्त्री शिकवते. हे स्त्रीची गुणवत्ता आणि तिची वैशिष्ट्य आहेत. सुष्मिता सेन पुढे म्हणाली की, 'मिस युनिव्हर्समध्ये येताना माझा पासपोर्ट हरवला होता'.


लारा दत्ताला विचारण्यात आला होता हा प्रश्न
2000मध्ये, लारा दत्तच्या डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकुट चढवण्यात. लारा दत्ताने यानंतर बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांतही काम केलं. अंतिम फेरीत लारा दत्ताला विचारलं गेलं होतं की, जर तुमच्यावर निषेध केला की, तुम्ही मिस युनिव्हर्स बनू नये तर तुम्ही काय कराल?


लारा दत्ता म्हणाली, 'मी म्हणेन की, मिस युनिव्हर्सचा हा किताब तुम्हाला बरेच प्लॅटफॉर्म देतो. रोजगाराच्या नवीन संधी खुल्या करुन देतो. प्रत्येक क्षेत्रात आपण गडबड न करता पुढे जाऊ शकतो. उद्योगापासून ते सैन्य आणि राजकारणापर्यंत सगळ्यांना आपल्या सूचना देऊ शकतो.'