`अपने बाप से पूछना...`, राजकुमार यांनी का घेतली सलमान खानची शाळा?
अनेकदा सलमानचे खासगी आयुष्यातले अनेक किस्से ऐकायला मिळतात. त्यातलाच एक किस्सा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सलमान सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सलमानच्या आयुष्यात काय सुरु आहे याबाबत जाणून घेण्यास त्याचे चाहते हे नेहमीच उत्सुक असतात. अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यातले अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळतात. त्यातला एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सलमानचा स्वभाव हा सगळ्यांना ठावूक आहे. नेहमी इतरांना अॅटिट्यूड देणाऱ्या सलमानला दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी सुनावले होते. हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सलमाननं 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बिवी हो तो ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. सलमानला खरं यश 1989 साली प्रदर्शित झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून मिळालं. या चित्रपटानंतर सलमान रातोरात स्टार झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सगळ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या पार्टीत राजकुमार यांनीही हजेरी लावली होती.
सलमानचा 'मैने प्यार किया' हा चित्रपट हिट झाल्यानंतर सलमानला अॅटिट्यूड आला होता. दरम्यान, सलमानला नशा करण्याची सवयही लागली होती. सक्सेस पार्टीत येताना सलमान ड्रिंक घेऊनच आला होता. नशेत बेधुंद असलेल्या सलमानची ओळख सुरज बडजात्या सगळ्यांशी करून देत होते. यानंतर राजकुमार यांच्याशी सलमानशी ओळख करुन देण्यात आली.
जेव्हा सुरज बडजात्या सलमानची राजकुमार यांच्याशी ओळख करुन देत होते तेव्हा सलमानने तुम्ही कोण? असा प्रश्न विचारला. हे ऐकताच राजकुमार यांना प्रचंड राग आला आणि सगळ्यांसमोर 'बरखुरदार अपने बाप से पूछना कौन हूं मैं' म्हणत चांगलंच सुनावलं होतं. यातून सलमानला एक चांगलाच धडा मिळाला होता. तेव्हापासून सलमान कोणत्याही पार्टीत गेला की मोठ्यांसोबत आदरानेच बोलायचा. राजकुमार जर त्या पार्टीत असतील तर स्वतःहून त्यांना भेटायचा आणि त्यांची विचारपुस करायचा. राजकुमार यांचा स्वभाव कडक होता. त्यांनी सलमानलाच नाही तर त्याआधी अनेकांना चांगलेच फटकारले होते. ३ जुलै १९९६ मध्ये राजकुमार यांचे निधन झाले.