`ठग्स ऑफ हिंदुस्तान` सिनेमाच्या पाचव्या दिवशी एवढी कमी कमाई
तुम्हाला देखील होईल आश्चर्य
मुंबई : शानदार ओपनिंगनंतर आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' हा सिनेमा अगदी तोंडावर पडला आहे. सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे असे खाली येतील असा कुणी विचारही केला नव्हता. विकेंडपर्यंत या सिनेमाने ठिक ठाक कमाई केली. पण आता वीकडेज सुरू झालेल्या मात्र हा सिनेमा चांगला चालत नाही.
सिनेमाने रिलीजच्या पहिल्या सोमवारी 90 टक्के घसरण पाहायला मिळाली. बॉक्स ऑफिस इंडियानुसार सोमवारी ठग्स ऑफ हिंदुस्तानने 5 ते 5.25 टक्के बिझनेस केला आहे. ही घसरण जास्त करून उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये पाहायला मिळाली.
सिनेमाने आतापर्यंत 124 करोड रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या दिवशी गुरूवारी 50.75 करोड, शुक्रवारी 28.25 करोड, शनिवारी 22.75 करोड आणि रविवारी 17.25 करोड रुपये कमाई केली आहे.
हा सिनेमा जवळपास 5000 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. एवढंच नाही तर जगभरात 7000 स्क्रिन या सिनेमाला मिळाली.. सिनेमा तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांत सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाला विजय कृष्णा आचार्यने दिग्दर्शित केला आहे.