`टाइगर 3` ठरला सलमान खानच्या करिअरमधला सगळ्यात मोठा चित्रपट; पण दिवाळीमुळे नाही मोडू शकला नाही `जवान`चा `हा` रेकॉर्ड
Tiger 3 Box Office Collection Day 1 : `टायगर 3` हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून हा चित्रपट सलमानच्या करिअरमधला पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये नंबर वन ठरला आहे. मात्र, हा चित्रपट शाहरुख खानच्या `जवान`चा रेकॉर्ड मोडू शकला नाही.
Tiger 3 Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफचा 'टायगर 3' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना आशा होत्या की सलमान 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटांचा रेकॉर्ड मोडणार आहे. मात्र, तसं काही झाली नाही, पण थिएटर्सच्या बाहेर सकाळच्या शूटला ढोल-नगाड्याच्या जोरात सुरुवात केली होती. त्यामुळे चित्रपटाची ओपनिंग ही खूप चांगली झाली. पण पहिल्या दिवशी केलेल्या कमाईतून 'टायगर 3' नं 'पठाण' आणि 'जवान'ला मागे टाकलं नाही.
चित्रपटगृहात फटाके फोडत काही चाहत्यांनी चित्रपट पाहिला. दुपारी 3 वाजे पर्यंत या शोनं खूप कमाई केली पण त्यानंतर प्रेक्षकांची संख्या कमी झाली. त्याचं महत्त्वाचं कारम हे लक्ष्मी पूजन होतं. हेच कारण आहे की सलमानच्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. Sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, 'टाइगर 3' नं पहिल्याच दिवशी सगळ्या भाषांमध्ये 44.50 कोटी कमाई केली आहे. रविवारी मॉर्निंग शोमध्ये 36.55% लोक होते. तर दुपारच्या शोमध्ये आणखी प्रेक्षक आले होते आणि त्यावेळी 42.73% प्रेक्षक थिएटरमध्ये होते. संध्याकाळी प्रेक्षक कमी झाले. पण नाईट शोजला फार कमी लोक होते. रात्रीच्या शोमध्ये 46.18% प्रेक्षक होते.
सैकलिन्कच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 25 कोटीची कमाई करू शकतो. हा चित्रपट पहिल्या दिवसापेक्षा कमी कलेक्शन करू शकतो. पण तिसऱ्या दिवशी जर चित्रपटानं 25 ते 30 कोटी कमाई केली तर सलमान खानचा 'टाइगर 3' हा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करू शकतो.
हेही वाचा : सलमान-कतरिनापासून दीपिका-रणबीरपर्यंत ब्रेकअपनंतरही 'हे' कलाकार आहेत चांगले मित्र
दरम्यान, सलमान खानच्या 'टायगर 3' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट यशराज स्पाय युनिव्हर्सचा पाचवा आणि टायगर फ्रेन्चायझीचा तिसरा भाग आहे. याआधी टायगर फ्रेन्चायझीमध्ये 'एक था टाइगर' आणि 'टाइगर जिंदा है' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. मात्र, सगळ्यांचं लक्ष या गोष्टीनं वेधलं आहे की सलमान आणि शाहरुखची जोडी त्यांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानची या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.