सलमान-कतरिनापासून दीपिका-रणबीरपर्यंत ब्रेकअपनंतरही 'हे' कलाकार आहेत चांगले मित्र

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेननं नुकत्याच एका दिवाळी पार्टीत हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल देखील तिच्यासोबत होता. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की ते दोघं ब्रेकअपनंतर देखील चांगले मित्र आहेत. ब्रेकअप झाल्यानंतर देखील मतभेद विसरून आयुष्यात ते पुढे जात आहेत. त्या दोघांचा 2021 मध्ये ब्रेकअप झाला होता. रोहमन हा सुष्मितापेक्षा वयानं 16 वर्षे लहान आहे. फक्त सुष्मिता नाही तर तिच्या आधी देखील काही कलाकार आहेत जे आज चांगले मित्र आहेत. 

| Nov 12, 2023, 14:40 PM IST
1/7

रणबीर - दीपिका

‘बचना ए हसीनों’ च्या शूटिंग दरम्यान, रणबीर आणि दीपिका जवळ आले. दोघं बराचकाळ रिलेशनशिपमध्ये राहिले पण मग त्यांचा ब्रेकअप झाला. पण आज ते दोघे चांगले मित्र आहेत. 

2/7

रणवीर - अनुष्का

'बँड बाजा बारात' या चित्रपटात रणवीरला अनुष्या आवडू लागली होती. ते दोघे काही वर्षे रिलेशनशिपमध्ये आले पण काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. आज ते दोघं खूप चांगले मित्र आहेत. दीपिकासोबत रणवीरनं जेव्हा लग्न केलं तेव्हा रिसेप्शन पार्टीत त्यानं अनुष्काला आमंत्रण दिलं होतं आणि ती त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. 

3/7

हृतिक- सुजैन

हृतिक आणि सुजैन यांनी 2014 साली घटस्फोट घेतला. त्यानंतर देखील ते दोघं एकत्र येऊन मुलांचा सांभाळ करताना दिसले. 

4/7

कतरिना - सलमान खान

सलमान खान आणि कतरिना कैफ हे कधी काळी रिलेशनशिपमध्ये होते याविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचा ब्रेकअप झाला होता. तरी आज देखील ते लोक एकमेकांच्या कुटुंबासोबत दिसतात. 

5/7

सलमान - संगीता बिजलानी

सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाच्या पत्रिका छापण्यात आल्या होत्या, मात्र, त्यांचं लग्न झालं नाही. मात्र, तरी देखील ते दोघं गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची मैत्री जपताना दिसत आहेत.

6/7

डीनो मोरिया आणि बिपाशा बासू

डीनो मोरिया आणि बिपाशा बासु बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. 1996 ते 2002 असं 6 वर्षांचं त्यांचं रिलेशनशिप होतं. दरम्यान, 2016 मध्ये जेव्हा बिपाशानं करण सिंह ग्रोवरसोबत लग्न केलं तेव्हा तिच्या लग्नात डीनो आनंदानं आला होता. 

7/7

मिलिंद सोमन - दीपानिता

मिलिंद सोमन आणि दीपानिता 2002 मध्ये रिलेशनशिपमध्ये होते मात्र, त्यांचा ब्रेकअप झाला. तर 2018 मध्ये मिलिंदनं अंकिता कुंवरसोबत लग्न केलं तेव्हा दीपानितानं त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. (All Photo Credit : Social Media)