Tiger 3 : सध्या चर्चा आहे ती म्हणजे टायगर 3 या चित्रपटाची. हा चित्रपट प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. यावेळी सध्या टायगर 3 चित्रपटातील एक गाणं सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे. या गाण्यात कतरिना कैफ दिसते आहे असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे त्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कतरिना कैफ यावेळी पुढे नाचताना दिसत असून तिच्यामागे कोरस डान्स करताना दिसतो आहे. यावेळी हा व्हिडीओ मागून घेतला असल्याचे दिसते आहे. सध्या हा सोशल मीडियावर लीक झाला असून यावेळी हा व्हिडीओ टायगर 3 च्या सेटवरील असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु यावेळी हा व्हिडीओ कुणी शुट केला? तो कुणाचा आहे? हा खरंच टायगर 3 च्या सेटवरील आहे का? असे प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पायरेटेड फिल्म्स त्यानंतर सोशल मीडियावर लीक होणाऱ्या क्लिप्स यामुळे चित्रपटाचे मेकर्स हे कायमच टेंशनमध्ये असतात. अशावेळी संपुर्ण काळजी घेणे हे फारच आवश्यक असते. त्यातून अशी घटना होऊन नये म्हणून त्यांना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. काही दिवसांपुर्वी जवान या शाहरूखच्या चित्रपटानंतर टायगर 3 चित्रपटातील हे गाणं सध्या व्हायरल नाही, लीक झालं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची जोरात चर्चा रंगलेली आहे. @bollyblindsandgossip या एका युझरनं रेडिटवरती ही व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. ज्यात कतरिना डान्स करताना दिसते आहे. चला तर मग पाहुया की नक्की प्रकरण आहे तरी काय?


हेही वाचा : Viral Meme Dog: इंटरनेटवर सर्वात जास्त व्हायरल झालेल्या 'चिम्स'चे निधन


काही दिवसांपुर्वी जवान या चित्रपटातील काही क्लिप्स या सोशल मीडियावर फार व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून हे क्लिप्स लीक करून व्हायरल करणाऱ्या 5 ट्विटर अकांऊट्सवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर रेड चीलीस् एन्टरटेंमेंटनं यावर कारवाई करत या प्रकरणी FIR सुद्धा दाखल केली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. 


आता टायगर 3 च्या या प्रकारानं डोकं वर काढलं आहे.