मुंबई : चाहते सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या 'टायगर 3' चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानसोबत लग्नानंतर कतरिना पहिल्यांदाच या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 'टायगर' चित्रपटाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना सलमान खानच्या मिठीत अशा प्रकारे दिसत आहे की, हे पाहून तिचा पती विकी कौशलला नक्कीच राग येईल एवढं मात्र नक्की.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानच्या मिठीत कतरिना
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, कतरिनाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे आणि सलमानने सैल असलेला राखाडी रंगाचा शर्ट घातला आहे आणि त्याच्या गळ्यात स्कार्फ आहे. हा व्हिडिओ 'माशा अल्लाह' गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा आहे ज्यामध्ये सलमान खान कतरिनाचा हात धरलेला दिसत आहे.


सलमानसोबत डान्स करताना कतरिना
या व्हिडिओमध्ये कतरिना अभिनेत्यासोबत माशा अल्लाह गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. कतरिना सलमानच्या मिठीत असून अतिशय आरामात डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर कतरिनाच्या डान्स स्टेप्स पाहून सलमानला आपल्या स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही आणि तो जोरजोरात हसायला लागतो. यानंतर तो कतरिनाला म्हणतो, 'आउटस्टँडिंग'.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


टायगर 3 दिवाळीला प्रदर्शित होणार आहे
सलमान खानचा 'टायगर 3' हा चित्रपट यावर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कतरिना आणि सलमानशिवाय या चित्रपटात इमरान हाश्मी दिसणार आहे. यामध्ये इमरान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे.


 बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसोबत काम केले. इतकंच नाही तर प्रत्येक पिढीतील अभिनेत्रींसोबत काम केले आहे. भिनेता सलमान खानच्या 'टायगर 3' ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. सलमान खान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गेल्या काही दिवसांपासून व्यस्त आहे. नुकताच त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरनं सगळ्यांचे लक्ष वेधले असून यावेळी झोया म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडकी अभिनेत्री कतरिना कैफ देखील दिसली आहे.