Akshay Kumar and Tiger Shroff : टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या 'छोटे मियां बडे मिया' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. ते दोघं सतत सोशल मीडियावर वेगवेगळे कॉमेडी व्हिडीओ शेअर करताना दिसतात. आज धुळवडीच्या निमित्तानं अक्षय आणि टायगरनं एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. तर नेटकऱ्यांना हा व्हिडीओ फार आवडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अक्षय त्याच्या घरातून बाहेर येताना दिसतो. त्यानंतर तो त्याच्या लॉनमध्ये जातो. अखेर तो त्याच्या घराच्या गेटच्या इथे पोहोचतो तिथे पाहतो तर टायगर बादली घेऊन अक्षयच्या अंगावर रंग टाकण्यासाठी तयारच असतो. हे पाहताच अक्षय त्याच्या हातात असलेलं नारळ टायगर दाखवतो आणि त्याच्या डोक्यात ते फोडण्याचा इशारा करतो. त्यानंतर अक्षय बोलतो टाक.... याचा अर्थ तो त्या रंगाच्या बादलीकडे करत असतो की तो रंग माझ्या अंगावर टाकू नकोस. नारळ म्हणजे शहाळ पाहताच टायगर तिच रंगाची बादली स्वत: च्या डोक्यावर ओतून घेतो आणि मग ती बादली स्वत: च्या डोक्यात घालतो. या सगळ्यात टायगरचा प्लॅन हा फ्लॉप झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर ते दोघं एकमेकांना धुळवडीच्या शुभेच्छा देतात. या व्हिडीओत अक्षयनं पिवळ्या रंगाचं टी-शर्ट आणि ग्रे रंगाची ट्रॅक परिधान केली आहे. तर अक्षयनं धुळवडी खेळली नाही असं त्यातून दिसत आहे. तर टायगर श्रॉफ हा टी-शर्ट लेस असून त्यानं काळ्या रंगाची ट्रॅक परिधान केली आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयनं "बुरा ना मानो होली है, होळीच्या शुभेच्छा" असं कॅप्शन दिलं आहे. 


हेही वाचा : तापसीनं आयुष्यात प्रेमाच्या रंगांचा बहर; 10 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर उदयपूरमध्ये उरकलं लग्न!


'छोटे मियां बडे मिया' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटाचा ट्रेलर उद्या 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार. तर हा चित्रपट ईद 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डेविड धवनच्या 'छोटे मियां बडे मिया' चा रिमेक आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, गोविंदा आणि माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तर त्याच्या या रिमेकमध्ये अक्षय कुमार आणि टाइगर श्रॉफ, अलाया एफ आणि मानुषी छिल्लर आहेत. तर सोनाक्षी सिन्हाची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. या चित्रपटातं दिग्दर्शन अली अब्बास जफरनं केला आहे.