Taapsee Pannu marries Mathias Boe : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सतत चर्चेत असते. खरंतर, गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की तापसी तिचा लॉग्न टाइम बॉयफ्रेंड मॅथियास बोएसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, आता अशी चर्चा आहे की तापसीनं उदयपुरमध्ये गुपचुप पद्धतीनं लग्न केलं आहे. असं म्हटलं जातं की तापसीनं मॅथियास बोसोबत 23 मार्च रोजी सप्तपदी घेतल्या आहेत.
न्यूज18 शोशाच्या रिपोर्ट्सनुसार, तापसी आणि माजी ओलंपिक पदक विजेता मॅथियास बोनं 23 मार्च रोदी कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-परिवारासमोर सप्तपदी घेतल्या. सूत्रांनुसार, 20 मार्चपासून तिच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. त्या दोघांनाही मीडियाचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घ्यायचं नाही आहे त्यामुळे त्यांनी गुपचुप पद्धतीनं लग्नाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. दरम्यान, अजून तापसीकडून किंवा मॅथियासकडून कोणतीही माहिती ही समोर आलेली नाही, किंवा त्यांनी या बातमीला दुजोरा दिलेला नाही.
रिपोर्ट्सनुसार, तापसीनं तिच्या लग्नात फक्त अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों यांना आमंत्रण दिलं होतं. तापसी आणि अनुराग कश्यप विषयी बोलायचे झाले तर तिनं अनुरागच्या ‘मनमर्जियां’ आणि ‘दोबारा’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. तर कनिका ढिल्लोंनं हसीन दिलरुबा’, ‘मनमर्जियां’, ‘फिर आई हसीन दिलरुबा’ या तिन्ही चित्रपटांची पटकथा लिहिली होती. कनिकानं तिच्या सोशल मीडियावरुन तापसीची बहीण शगुन आणि तिच्या चुलत भावंडांसोबत फोटो देखील शेअर केला आहे. तर कनिकानं काल तिचा पती हिमांशु शर्मासोबत फोटो शेअर केला होता. ते फोटो शेअर करत कनिकानं माध्या मित्राचं लग्न आहे असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा : श्रद्धा कपूरनं रुमर्ड बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर केला शिक्का मोर्तब! पोस्टमुळे चर्चांना उधान
तापसी पन्नू आणि बॅडमिन्टन खेळाडू मॅथियास बोए जवळ जवळ एक दशक म्हणजेच 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. तापसी पन्नू आणि मॅथियास पहिल्यांदा 2013 मध्ये इंडियन बॅडमिन्टर लीगच्या उद्घाटन कार्यक्रमात भेटले होते. दरम्यान, त्या दोघांपैकी कोणीही कधीच त्यांच्या रिलेशनशिपविषयी मोकळेपणानं काही सांगितलेलं नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी जेव्हा तापसी लवकरच लग्न करणार आहे अशी चर्चा सुरु झाली होती. त्याविषयी विचारताच तापसीनं तेव्हा सांगितलं होतं की मला माझ्या खासगी आयुष्यावर काहीही बोलायचं नाही. तापसीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच 'फिर आई हसीन दिलरुबा', 'वो लड़की है कहां' आणि 'खेल खेल में' चित्रपटांमध्ये दिसणार आहे.