नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ सध्या आपली गर्लफ्रेंड दिशा पटानीसोबत श्रीलंकेत न्यू इयर हॉलीडेज एन्जॉय करत आहे. हे दोघंही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह आहेत आणि ते नेहमी फोटोज शेअर करत असतात. या दोघांनी आपल्या नात्याचा उघडपणे खुलासा केला नसल्याने एकमेकांसोबतचे फोटोज शेअर करणे ते टाळतात.


फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र दोघांनी आपल्या इंस्टाग्रामवरून आपले फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. फोटोत टायगर स्विमवेअरमध्ये आपली बॉडी दाखवत आहे. तर दिशा देखील अत्यंत मस्त दिसत आहे.




न्यू ईयर श्रीलंकेत


टायगर आणि दिशा दोघेही एकत्र श्रीलंकेला रवाना झाले होते आणि दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात टायगर दिशाच्या मांडीवर बसला होता. यात दोघांसोबत रणवीर सिंग देखील होता. 


लवकरच एकत्र चित्रपटात झळकणार


टायगर आणि दिशा एका म्युजिक व्हिडिओत 'बेफिक्रा' मध्ये एकत्र दिसले होते. त्यातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. आता लवकरच दोघेही 'बागी 2' या चित्रपटात एकत्र दिसून येतील.