मुंबई : 'बागी'च्या यशानंतर रसिकांना त्याच्या सिक्वेलची उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बागी 2 मध्ये टायगर श्रॉफ सोबत दिशा पटणी झळकणार आहे. दोघांनी 'बागी 2' च्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. तसेच या चित्रपटाचे पहिले शेड्युलही त्यांनी एकत्र संपवले आहे. 


दिशा आणि टायगराने खुद्द सोशल मीडियावर एका खास फोटोच्या माध्यमातून ही बातमी दिली आहे. एका व्हिडियोत त्यांच्या चाहत्यांसाठी संदेशही रेकॉर्ड करण्यात आला होता. सोबतच स्विमिंगपूलमध्ये दिशा आणि टायागरने एकत्र फोटो क्लिक करून पहिले शेड्युल संपल्याची माहिती दिली. 



 


दिशा आणि टायगर हे बी टाऊनमधील नवी ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडी असल्याचेदेखील वृत्त काही दिवसांपूर्वी पसरले होते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दिशा आणि टायगर लिव्ह इनमध्ये राहण्याचा प्लॅन करत आहेत असे सांगण्यात आले होते. मात्र टायगरच्या कुटुंबियांकडून मात्र हा सार्‍या गोष्टी फेटाळण्यात आल्या आहेत.