मुंबई : अभिनेता टायगर  श्रॉफ कायम त्याच्या डान्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. त्याला फिट ठेवण्यामागे एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं. तो व्यक्ती दुसरा कोणीही नाही तर टायगरचा फिटनेस ट्रेनर कैझाद कपाडिया. पण कैझादचं निधन झालं आहे. टायगरने त्याच्या फिटनेस ट्रेनर कैझादच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिली. कैझादच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्याच्या मृत्यूमुळे फिटनेस विश्वाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक सेलेब्स फिट बनवणाऱ्या कैझादच्या निधनावर टायगरची आई आयशा श्रॉफ, सिद्धांत कपूरसह अनेक सेलेब्स दु: ख व्यक्त करत आहेत आणि आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत. कैझादने अनेक सेलिब्रिटींना फिटनेट टीप्स दिल्या आहेत. 



टायगर श्रॉफने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कैझादचा फोटो शेअर करून श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाय फिटनेसबद्दल कॅप्शनही लिहिले आहे. टायगरने लिहिले की 'रेस्ट इन पॉव्हर कैझाद सर'. यासोबतच त्याने हृदयाचे इमोजी शेअर करून आपल्या भावना शेअर केल्या आहेत.


मुंबईत फिटनेस अकॅडमी चालवणाऱ्या कैझादचा टायगर श्रॉफच्या फिटनेसमध्ये मोठा वाटा आहे. मिड डे ला दिलेल्या मुलाखतीत कैझादने सांगितले की, सेलिब्रिटी ट्रेनर असणे सोपे नाही. अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. मी स्वतःला सेलिब्रिटी ट्रेनर मानत नाही. मी माझ्या अकादमीमध्ये लिहिले आहे की एक सेलिब्रिटी ट्रेनर बनण्याची इच्छा नाही, परंतु त्याऐवजी ट्रेनर बनण्याची इच्छा आहे...