मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘बागी २’ सिनेमाची चर्चा आतापासूनच रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर या सिनेमात दोन लूकमध्ये दिसणार आहे. यात टायगर टक्कल करणार असल्याचे समजते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मे महिन्यात रिलीज करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये त्याचा एक लूक जारी करण्यात आला होता. पहिल्या पोस्टरमध्ये टायगर रायफल पकडून उभा असलेला दिसला आहे. दुसरं पोस्टर यायचं आहे. हा सिनेमा २७ एप्रिल २०१८ ला रिलीज होणार आहे. 


काही दिवसांपूर्वीच निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या आगामी ‘बागी २’मध्ये दिशा पटनीला मुख्य भूमिका देण्याची घोषणा केली होती. या सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आएह. ‘बागी’ सिनेमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. त्यामुळे या सिनेमाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


याच वर्षी टायगरने ट्विटरवर त्याच्या ‘बागी’ सिनेमाच्या सिक्वलची घोषणा केली होती. त्यासोबतच पोस्टर रिलीज केलं होतं.