`टिक टॉक`मुळे दहशतवाद फोफावतोय - अशोक पंडीत
आजच्या तरूणाईमध्ये सोशल मीडियाची क्रेझ फार आहे.
मुंबई : आजच्या तरूणाईमध्ये सोशल मीडियाची क्रेझ फार आहे. सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी काहीन काही नवीन गोष्टी व्हायरल होत असतात. त्यात 'टिक टॉक'ने सर्वाच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण आता 'टिक टॉक' वर व्हिडिओ बनवणे चांगलेच महागात पडणार आहे. टिक टॉक वर फेजू द्वारे पोस्ट करण्यात आलेल्या अक्षेपार्ह व्हिडिओनंतर बॉलिवूडमंडळी देखील नाराज झाले आहेत. दुसरीकडे, 'टिक टॉक इंडियाने हे स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ टिकटॉकच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहेत. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरून देखील काढण्यात आला आहे.
'टिक टॉक' वर फैसल शेख फार प्रसिद्ध आहे. mr_Faisu07 या नावाने त्याचे टिक टॉकवर अकाउंट आहे. त्याचे टिकटॉकवर जवळपास २४ मिलियन चाहते आहेत. अभिनेता०७ (Actors07) नावाच्या टिक टॉक अकाउंटवरून नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओत झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींग प्रकरणी शिकार झालेल्या तरबेज अंसारीच्या मृत्यूला मुद्दा बनवत घृणास्पद व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
IFTDA चे अध्यक्ष अशोक पंडीत यांच्या मते अशा मुलांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ त्यांच्या विचारांचे प्रदर्शन करत आहे. टीक टॉकच्या माध्यामातून दहशतवादाला दुजोरा देणारे संदेशही मुलं पसरवत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना मुकाट सोडता कामा नये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहीजे.
त्याचप्रमाणे टिक टॉक तर्फेही त्यांचे अकाउंट डिलीट करण्यात आले पाहिजेत. शिवाय त्यांच्यावर कठोर कारवाईही करण्यात आली पाहिजे असे पंडित म्हणाले आहेत. त्यनंतर या मुलांनी घडल्या प्रकाराची माफी सोशल मीडियाच्या माध्यमातून मागीतली आहे. एक पोस्ट शेअर करत त्यांनी माफी मागीतली आहे.