मुंबई : अंबानी कुटुंबातील प्रत्येक लग्न सर्वाधिक चर्चेत असतं. मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलं आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या लग्नाची सगळीकडेच चर्चा झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाही लग्नाने लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केले होते. त्यानंतर आता अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा अनमोल अंबानी यांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नात देखील अंबानी परिवाराने कोणतीच कसर सोडली नाही. अगदी शाही पद्धतीने हा विवाहसोहळा करण्यात आला.


20 फेब्रुवारी 2022 रोजी अनमोल अंबानीने क्रिशा शाहसोबत लग्न केले. हे लग्न रॉयल असण्यासोबतच सगळ्यांनाच लक्षात राहिलं असं होतं. विशेष पोशाखांसह वऱ्हाड्यांनी वरातीत खूप मजामस्ती केली आणि संपूर्ण अंबानी कुटुंबाने त्यांचा सरप्राईज डान्स परफॉर्मन्स या लग्नसोहळ्यात दाखवला.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आता अनमोल-क्रिशाच्या लग्नाशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अंबानी कुटुंब लग्नासाठी डान्सचा सराव करताना आणि त्यानंतर लग्नात तो सादर करताना दिसत आहेत.


कोरिओग्राफर राहुल परदासनी यांनी 27 जानेवारी 2022 रोजी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, सासू टीना अंबानी आणि इतर कुटुंबातील सदस्यांच्या सरावापासून ते लग्नातील परफॉर्मन्स पर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत. आणि हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.