मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या जीवनात अनेक रंग आहे, तेवढेच अफेअर्स देखील, संजय दत्त आणि टीना मुनीम यांचं अफेअर असल्याची चर्चा ८० च्या दशकात आली होती. राजकुमार हिरानी संजय दत्त यांच्या जीवनावर संजू सिनेमा घेऊन येत आहेत. हा सिनेमा जून महिन्याच्या शेवटी रिलीज होईल. या सिनेमात संजय दत्तच्या जीवनाशी संबंधित तमाम प्रसंगांचा समावेश करण्यात आला आहे. संजय दत्त आणि टीना मुनीम यांचे एकमेकांशी कसे संबंध होते हे देखील या सिनेमात दाखवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण हे संबंध कसे होते आणि कसे काय दाखवण्यात येणार आहेत, हे सिनेमा रिलीज झाल्यानंतर समजणार आहे. चित्रपट रिलीज होईपर्यंत यावर सस्पेंन्स आहे. चित्रपटात संजय दत्तच्या जीवनावर आधारीत वादग्रस्त पुस्तक देखील आलं आहे. यात टीना आणि संजय दत्तचे संबंध आणि ब्रेकअपचा देखील समावेश आहे.


१९८१मध्ये रॉकी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान टीना आणि त्याचं प्रेमाच रंग गडद होत होता असं म्हटलं जातं. दोन्ही डेट करत होते. मात्र संजय दत्तच्या ड्रग्स आणि नशेच्या सवयीमुळे, हे नातं अचानक संपलं.


दी यासिर उस्मान यांनी संजय दत्तची बायोग्राफी लिहिली आहे, ती वादग्रस्त आहे. 'द क्रेजी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलीवुड बेड बॉय' या वादग्रस्त बायोग्राफीनुसार, ब्रेकअपनंतर संजय दत्तला अतिशय कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला.


या वादग्रस्त पुस्तकातील प्रसंगानुसार १९८२ मध्ये एका सायंकाळी संजय दत्तचे शेजारी बंदुकीचा आवाज ऐकून दचकले. संजय दत्तने हवेत २२ बोर रायफल चालवली होती, असं या पुस्तकात म्हटलं जातंय. काही वेळाने शेजारी जमा झाले, तेव्हा संजय दत्त खूप घाबरलेला आणि चिंतेत दिसत होता. संजय दत्त रडत होता आणि म्हणत होता, 'तुम्ही मला का घाबरत आहात, मी ड्रग्सच्या आहारी नाही गेलो, मी ड्रग सोडला आहे'.


टीना संजयला सोडून गेल्यानंतर संजय दत्त चिंतेत राहिला. ओपन फायर केल्यानंतर त्याने तो़डफोड देखील केली. संजय दत्तने यासिर उस्मानच्या पुस्तकातील या कथित घटनेवर आक्षेप घेतला आहे. संजय दत्तने म्हटलं आहे, ही त्यांचा बायोग्राफी प्रमाण मानता येणार नाही. तसेच माझी ऑफिशियल बायोग्राफी लवकरच येईल.