Leonardo Dicaprio: टायटँनिक हा चित्रपट जगभर आजही पाहिला जातो.. त्या चित्रपटातील जॅक आणि रोझची जोडी कायमच लोकप्रिय राहिली आहे. त्यातून या चित्रपटातील माय हार्ट विल गो ऑन हे गाणंही प्रचंड लोकप्रिय ठरलं. परंतु नुकत्याच आलेल्या बातमीनुसार या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्याचं ब्रेकअप झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियो (leonardo dicaprio) आणि अमेरिकन मॉडेल कॅमिला मोरोन यांचे ब्रेकअप झाले आहे.


47 वर्षीय लिओनार्डो गेल्या 4 वर्षांपासून 25 वर्षीय कॅमिलासोबत डेटिंग करत होता. लिओनार्डो आणि कॅमिला पहिल्यांदा 2017 मध्ये जोडपे म्हणून दिसले होते. लिओनार्डो आणि कॅमिला नुकतेच 4 जुलै रोजी एकत्र स्पॉट झाले होते. 


लिओनार्डो डी कॅप्रियो आणि कॅमिला मोरोन यांनी त्यांचे नाते खाजगी ठेवले असले तरी, त्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले. लिओनार्डा ऑस्कर कार्यक्रमात कॅमिलासोबत आला होता. जवळपास 15 वर्षांनंतर अशी घटना घडली, ज्यामध्ये लिओनार्डो आपल्या मैत्रिणीसोबत ऑस्कर अवॉर्डमध्ये पोहोचला होता.


लिओनार्डो डिकॅप्रियो आणि कॅमिला मोरोन दोघेही सप्टेंबर 2021 मध्ये यूएस ओपनमध्ये एकत्र दिसले. सुत्रांनुसार लिओनार्डो आणि कॅमिला यांच्या विभक्त झाल्याची पुष्टी केली,परंतु त्यांच्या विभक्त होण्याचे कारण स्पष्ट केले नाही.


द सनच्या वृत्तानुसार, लिओनार्डो आणि कॅमिला यांनी जूननंतर त्यांचे नाते संपवले. “लिओनार्डो आणि कॅमिला यांनी त्यांचे नाते संपवले… त्यांच्यामध्ये कोणतीही वाईट भावना नाही. दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे."