TMKOC: तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सध्या सगळीकडेच लोकप्रिय आहे. 14 वर्षे झाली तरी ही मालिका अजूनही प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेची क्रेझ अद्यापही कायम आहे. सध्या या मालिकेला घेऊन अनेक ठिकाणी वादविवाद सुरू आहेत. या अगोदर या निर्मात्यांच्यात आणि कलाकारांमध्ये वाद सुरू होते. आता या मालिकेतील अभिनेत्रींनी निर्मात्यांवर लैंगिक छळाचे (Tarak Mehta Serial Controversy) आरोप केले आहेत. या मालिकेतील अनेक कलाकार हे लोकप्रिय आहेत. त्यांची सोशल मीडियावरूनही अनेकदा चर्चा होत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेतील टप्पू तुम्हाला आठवतोय का? टप्पूची भुमिका करणारा भव्य गांधी हा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. परंतु यावेळी त्याचा फोटो पाहून मात्र नेटकऱ्यांनी (Bhavya Gandhi as Tappu) त्याला ट्रोल केलं आहे. (TMKOC actor bhavya gandhi gets trolled after posting a photo on instagram netizen says he looks like uncle)


भव्य गांधी (Bhavya Gandhi Instagram) आता मोठा झाला असून तो 25 वर्षांचा झाला आहे. यावेळी त्यानं आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे परंतु त्याचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याला नेटकऱ्यांनी मात्र फारच ट्रोल केले आहे. यावेळी त्यानं समुद्रकिनारी पोझ देत आपला एक फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यानं चेक्सचा शर्ट आणि जीन्स पॅंट घातली आहे आणि सनग्लासेस घातले आहेत. परंतु डॅशिंग पोझ देऊनही मात्र यावेळी तो ट्रोल झाला आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन फारच मनावर घेतले आहे. 


हेही वाचा - 'बहरला हा मधुमास' गाण्यानंतर आफ्रिकन युट्यूबर्सचा 'या' गाण्यावर Video, सोशल मीडियावर धुमाकूळ


काहींनी लिहिलंय की, ''तू 25 वर्षांचा असलाच तरी तू 30 वर्षांचा वाटतो आहेस.'' तर एकानं म्हलंय की, ''तू मोठा झालास पण फार बुजूर्ग वाटतोयस'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, ''तू एन्कल वाटतो आहेस.'' त्याचबरोबर त्याला काहींनी जीमला जायचाही सल्ला दिला आहे. काहींनी तर तू सरळ अभिनेता शोभत नाहीस असेही म्हटले आहे. सध्या त्याच्या या फोटोवर नाना तऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत.



'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतून अनेक कलाकारांनी काढतापाय घेतला आहे. तरीही ही मालिका लोकं आवडीनं पाहत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेनची (Dayaben) सर्वाधिक चर्चा होताना दिसते. त्याचबरोबर या मालिकेतील काही विनोदी व्हिडीओज व्हायरल होताना दिसतात.