DSLR पेक्षा भारी फोटो येतात; 20 हजारमध्ये खरेदी करा 'हे' बेस्ट कॅमेरा फोन

20 हजारापेक्षा कमी किंमतीत मिळणारे हे आहेत बाजारात आलेले 5 नवीन व दमदार स्मार्ट फोन ; फोन पाहताच फोटोग्राफी लव्हर होतील वेडे...  

Jun 06, 2024, 21:20 PM IST

BEST CAMERA SMARTPHONES : फोन खरेदी करताना त्याचे कॅमेरा फिचर पहिले तपासले जाते. चांगली फोटो क्वालीटी मिळेल असेच फोन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असतो.  फोटोग्राफीची आवड असेल  जर तुम्ही 20 हजारच्या बजेटमध्ये बाजारात आलेले लेटेस्ट व बेस्ट कॅमेरा फोन शोधत असाल तर हे फोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात.

1/6

Tecno Camon 20 Pro 5G:  या फोनची किंमत  19,390 रुपये आहे.  हा फोन 64MP RGBW OIS मुख्य कॅमेरा, 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP फोकस  कॅमेरासह येतो. तर यात सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आहे. यात Mediatek Dimensity 8050 प्रोसेसर आहे.   

2/6

Samsung Galaxy M34 5G:  या फोनची किंमत 18,999  रुपये आहे. हा फोन 50MP+8MP+2MP रियर कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरासह येतो. तसेच, यात 6000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर Exynos 1280 प्रोसेसर आहे.

3/6

Redmi Note 12 5G  :  Redmi Note 12 स्मार्टफोनमध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याला 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 33W फास्ट चार्जिंग दिले जात आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर देण्यात आला आहे.

4/6

Realme Narzo 60 5G: या फोनची किंमत  17,999 रुपये इतकी आहे. यात 64MP स्ट्रीट फोटोग्राफी कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

5/6

Realme 10 Pro 5G:  या फोनची किंमत 18,999 इतकी आहे. हा फोन 108MP + 2MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. यासोबतच Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी देखील येथे उपलब्ध आहे.

6/6

OnePlus Nord CE 3 Lite 5G: या फोनची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन 108MP बॅक कॅमेरा, 2MP डेप्थ असिस्ट लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह येतो. यात 16MP सेल्फी कॅमेरा आहे. यासोबतच यामध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.