मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेनं थोड्याच दिवसात प्रेक्षकांची मनं जिंकली. अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत ही मालिका पाहण्याचा मोह काही आवरला नाही. कधी रुसवे फुगवे तर कधी भांडणं तर कधी सणसमारंभ... मालिकेतील गोकुळधाम ही सोसायटी घराघरातल्या प्रत्येकाला अगदी आपली वाटू लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मालिकेला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. Malav Rajda यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. हा फोटो केकचा होता. यावर तारक मेहता मालिका 15 व्या वर्षात पदार्पण करत आहे असं लिहिलं आहे. त्यांनी हा फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला.


या 15 वर्षांचा प्रवास खूप कमाल होता असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यांनी तारक मेहताच्या टीमचे आणि प्रेक्षकांचेही मनापासून आभार देखील मानले आहेत. टप्पूसेनेपासून ते अगदी बापूंपर्यंत सगळ्या कलाकरांनी चाहत्यांची मनं जिंकून घेतली. 


आज्ञाधारी आणि व्यवसायिक जेठालाला, लेखक आणि बायकोच्या डाएटला वैतगालेला तारक मेहता, शिस्तप्रिय शिक्षक, भिडे, लहरी पण मैत्री निभावणारा सोढी, चिवट पण तितकाच खोडकर अय्यर, खादाड डॉक्टर हाथी, लग्नाळू पोपटलाल, मदतीला धावणारा अब्दूल, टप्पूसेना, महिला मंडळ, इंग्रजीने फिरकी घेणारे आणि कायम पगारवाढीची मागणी करणारे नट्टू काका आणि सरळसाधा बागा या सगळ्या पात्रांना आज 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. 


तारक मेहता ही सीरियल आजही अनेक घरांमध्ये पाहिली जाते. अडचण असो किंवा कोणताही मुद्दा विनोदाच्या अंगाने लोकांच्या डोळ्यात अंजन आणि त्यासोबत मनोरंजन अशा दुहेरी भूमिकेत सुरू असलेली ही मालिका आता 15 व्या वर्षात पदार्पण करत आहे.