TMKOC: `तारक मेहता का उल्टा चष्मा` होणार बंद? माजी दिग्दर्शकाची पत्नी म्हणाली `शोच्या टीआरपी...`
TMKOC : गेली चौदा वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका `तारक मेहता का उल्टा चष्मा` मालिकेला मोठा धक्का, मालिकेच्या लोकप्रियतेवर होणार परिणाम?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील (Television) सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या प्रसिद्ध मालिकेतील पात्र घराघरात पोहोचली आहेत. 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या सिटकॉम शोचा टीआरपी नेहमीच उच्च स्थानी राहिला आहे. मात्र काही काळापासून अनेक कलाकार या शोमधून एक्झिट घेताना दिसून आले आहे. अलीकडेच शोचे दिग्दर्शक मालव राजदा यांनीही शो सोडण्याची घोषणा केली होती. एकापाठोपाठ एक अनेक कलाकारांच्या शोला निरोप दिल्यामुळे त्याचा टीआरपीवर परिणाम होत आहे. मात्र, 'रिटा रिपोर्टर' म्हणजेच प्रिया आहुजा हिने या विषयाला असहमती दर्शवली आहे.
अनेक कलाकार शो मधून एक्झिट
दिग्दर्शक मालव आहुजा यांची पत्नी प्रिया ही रीटा रिपोर्टर बनून या मनोरंजन शो काम करत होती. तिनेही या शो मधून आधीच एक्झिट घेतली आहे. त्याचबरोबर दिशा वकानी, भव्य गांधी, शैलेश लोढा, राज अनाडकट यांसारख्या दिग्गज कलाकारांनी यापूर्वी या शोचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जागी इतर कलाकारांची एंट्री घेतली पण आता शोमध्ये पूर्वीसारखा चालत नाही, असे यूजर्सचे मत आहे. या कलाकारांचे जाणे निर्मात्यांसाठी मोठी गोष्ट असली तरी याचा परिणाम शोच्या टीआरपीवर झाल्याचेही चाहत्यांचे मत आहे.
वाचा : Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स
तारक मेहता... ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर..
यावेळी प्रिया आहुजा म्हणाली की, टीव्हीवर शो पाहण्याऐवजी लोक OTT वर सोयीनुसार शो पाहणे पसंत करतात. प्रत्येकाला आपल्या कामातून फ्री होऊन आपल्याइच्छेनुसार शो किंवा चित्रपट पाहणे आवडते. तर दुसरीकडे शोच्या गुणवत्तेत कोणतीही घसरण झालेली नाही. त्यापेक्षा बघणाऱ्यांच्या दृष्टीकोनातील फरकामुळे हे सर्व घडले आहे. TRP चा हा नंबर गेम मला कधीच समजला नाही. पण तारक मेहता... ही मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे यावर माझा विश्वास नाही." अशी प्रतिक्रिया प्रियाने दिली आहे. त्याचवेळी, तारक मेहता शो बंद झाल्याबद्दल तिने सांगितले की, मालिका बंद होण्याच्या मार्गावर आहे यावर माझा विश्वास नाही.