Whatsapp वरूनही बुक करू शकता Cab, Uber; फॉलो करा 'या' स्टेप्स

Book Uber Ride Via Whatsapp : आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर युजर्स कॅब बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कॅब कशी बुक करायची? याबाबत जाणून घेऊया. 

Jan 08, 2023, 11:29 AM IST
1/6

चॅटिंगसाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. पण, कालांतराने त्यात अनेक सुधारणाही करण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी बुक करू शकता. उबेर तुम्हाला मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपद्वारे राइड बुक करण्याची परवानगी देते. त्याची पद्धत अगदी सोपी आहे.

2/6

मात्र, ही सेवा सध्या केवळ निवडक ठिकाणीच उपलब्ध आहे. तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे उबेर राइड बुक करू शकता. ही सेवा सध्या दिल्ली-एनसीआर आणि लखनऊमध्ये सुरू करण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल नंबरवर मेसेज पाठवायचा आहे.

3/6

याशिवाय व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांची राइड व्यवस्थापित करू शकतात. वापरकर्त्यांना ट्रिपची पावती देखील मिळू शकते. वापरकर्ते इंग्रजी आणि हिंदीमध्ये राइड बुक करू शकतात. दिल्ली-एनसीआर किंवा लखनऊमध्ये राहत असाल आणि तुम्हाला व्हॉट्सअॅपद्वारे राइड बुक करायची असेल, तर ते कसे करायचे ते येथे आहे.

4/6

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे उबेर राइड बुक करण्यासाठी स्मार्टफोनच्या संपर्क यादीमध्ये +91 7292000002 सेव्ह करा.

5/6

सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअमध्ये उबेर चॅटबॉटसोबत नवीन चॅट सुरू करा. तुम्ही http://wa.me/917292000002 द्वारेही चॅट करू शकता. चॅटमध्ये Hi लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर तुम्ही पिकअप आणि गंतव्यस्थानासाठी पूर्ण पत्ता पाठवू शकता. पिकअपसाठी तुम्ही लाइव्ह लोकेशन देखील शेअर करू शकता.

6/6

तुम्हाला उबेरकडून अपेक्षित भाडे आणि इतर तपशील प्राप्त होईल. आता तुम्हाला भाडे आणि राइड निश्चित करणे आवश्यक आहे. जवळपासच्या चालकाने तुमची राइड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर उबेर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल.