मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka ooltah Chashmah) या लोकप्रिय टीव्ही शोने गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंय. या शोमधील अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक म्हणजे (Popatlal) पोपटलाल. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून पोपटलाल लग्नासाठी उतावला आहे. पण वेगवेगळ्या कारणांमुळे पोपटचं लग्न काही होतचं नाही. त्यामुळे त्याचे चाहतेही कायम त्याच्या लग्नाचीची वाट पाहत असतात. मात्र त्याच पोपटलालने त्यांच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज दिली आहे. (tmkoc poptlal finally married coming soon in show actor shyam pathak confirm)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोपटलालची भुमिका साकारणाऱ्या श्याम पाठकने (Shyam Pathak) एका व्हीडिओद्वारे लवकरच पोपटलालच्या आयुष्याच मिसेस पोपटलाल ( Mrs. Popatlal) येणार असल्याचं नक्की केलंय. 


पोपटलालंच लग्न 


पोपटलालचे लग्न येत्या एपिसोडमध्ये होऊ शकते. अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत शो सोडला आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकारांची एन्ट्री झाली आहे. अशा परिस्थितीत  शोमध्ये अनेक नवे चेहरे येऊ शकतात. यामध्ये पोपटलालची पत्नीही त्यापैकी एक असू शकते, असं बोलले जात आहे.


सोशल मीडियावर (Social Media) एक व्हीडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे.  ज्यामध्ये पोपटलालची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठक याने शोमध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले आहे.