नृत्यांगना असणं फार कठीण- मलायका अरोरा
अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या हॉट फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आहे. ती नेहमी तिच्या फिटनेस बद्दल ओळखली जाते. त्याचप्रमाणे तिचे नृत्य कौशल्य देखील फार चांगले आहे. मलायका तिच्या दिलखेच अदा आणि नृत्य कौशल्याने चाहत्यांना घायाळ करत असते. एक नृत्यांगना असणे किती कठीण असते याचा खुलासा मलायकाने 'डान्स इंडिया डांन्स' शो मध्ये केला आहे. 'छैंया छैंया' गाण्याच्या चित्रीकरणा दरम्यान कोणत्या आणि किती गोष्टींचा सामना करावा लागला हे तिने सांगीतले आहे.
नुकताच 'डान्स इंडिया डांन्स ७' शोमध्ये मलायका पाहुणी परीक्षक म्हणून उपस्थित होती. या शोची परीक्षक अभिनेत्री करिना कपूर आहे, पण सध्या ती लंडनमध्ये असल्यामुळे करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा दोघी उपस्थित होत्या. 'दिल से' चित्रपटामधील आयटम सॉन्ग 'छैंया छैंया'च्या चित्रीकरणा दरम्यान तिच्या शरिरातून रक्त निघू लागलं होतं.
'डान्स इंडिया डान्स ७' च्या मंचावर ती 'छैंया छैंया' गाण्यावर थिरकली. त्यानंतर ती म्हणाली 'शाहरूख खान, दिग्दर्शक मणिरत्नम आणि छायाचित्रकार संतोष सिवन यांच्या सोबत साकारण्यात आलेल्या गाण्यामुळे मला मोठे यश मिळाले. त्यापुढे मला झालेली दुखापत फार लहान वाटली' मलायकाने सोशल मीडियावर तिचे 'डान्स इंडिया डान्स ७' शोमधील काही फोटो शेअर केले आहे.