नवी दिल्ली : महिलांसाच्या मासिक पाळीबद्दल आपल्या समाज्यात अनेक समज-गैरसमज आहेत. इतकंच नाही तर याविषयावर मोकळेपणाने बोलले देखील जात नाही. मात्र बॉलिवूडचा खिलाडी यावर चक्क एक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून  त्यानिमित्ताने तरी मासिक पाळीबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल, अशी आशा आहे. 


प्रमोशनसाठी लढवली अनोखी शक्कल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. प्रमोशनला अक्षय मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे. अशातच अक्षय आणि ट्विंकल खन्ना यांनी बॉलिवूड सेलिब्रेटींजना पॅडमॅन चॅलेंज दिले. तिचे हे चॅलेंज स्वीकारत अनेक सेलिब्रेटींनी सॅनिटरी नॅपकीनसह आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 


आलिया भट्टने जीममध्ये सॅनिटरी नॅपकीनसोबत काढलेला फोटो शेअर केला आणि लिहीले, धन्यवाद अक्षय कुमार या चॅलेंजसाठी. मी आता माझ्या जीमच्या फ्रेंडसोबत हे चॅलेंज पुढे नेईन. 



अक्षय आणि ट्विंकलचे चॅलेंज आमिरनेही स्विकारले आणि आपला फोटो शेअर करत लिहिले की, धन्यवाद ट्विंकल खन्ना. माझ्या हातात पॅड आहे आणि त्यात लाजण्यासारखे काहीच नाही. हे स्वाभाविक आहे. #PadManChallenge. त्याचबरोबर हे चॅलेंज त्याने आपल्या बॉलिवूडमधील सहकलाकारांनाही दिले आहे. त्यात अमिताभ बच्‍चन, शाहरुख खान आणि सलमान खान यांचा समावेश आहे.



सॅनिटरी पॅडसोबतचा फोटो सोनम कपूरनेही शेअर केला. 



खिलाडी अक्षयनेही पॅडसोबत फोटो शेअर केला. आणि आलिया भट्ट, दीपिका पदुकोण आणि विराट कोहलीलीही या चॅलेंजमध्ये टॅग केले.



अक्षयचा पॅडमॅन हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होईल. यात महिलांची मासिक पाळी आणि त्याबद्दलच्या समस्यांवर भाष्य केले आहे. यात अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर प्रमुख भूमिकेत आहेत.