नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय आज रिया चक्रवर्तीची चौथ्यांदा चौकशी करणार आहे. सोबतच सुशांतची बहीण मीतू सिंहची देखील चौकशी होईल. यासाठी सीबीआयने सुशांतची बहीण मितू सिंगला नोटीस पाठवलीय. सीबीआय तिची बाजु रेकॉर्ड करेल.आज सकाळी ११ वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये ही कार्यवाही होईल. सुशांतची दुसरी बहीण नितू सिंहला देखील नोटीस पाठवण्यात आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मितू सिंग आणि रिया चक्रवर्तीला समोरासमोर बसवून चौकशी होऊ शकते. या प्रकरणाशी संबंधित आणखी काही जणांची देखील चौकशी होऊ शकते.


रविवारी ९ तास चौकशी 


सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयने रिया चक्रवर्तीची ९ तास चौकशी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने १ जून ते १४ जून पर्यंतचा घटनाक्रम सांगितला. 



८ जूनला रियाने सुशांतचा फ्लॅट सोडला होता आणि त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. याआधी शुक्रवारी रियाची १० तास तर शनिवारी ७ तास चौकशी झाली. अशाप्रकारे रिया चक्रवर्तीसोबत सीबीआयने आतापर्यंत २६ तासांहून अधिक वेळ चौकशी केलीय.


सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज बाजू विचारात घेतली जातेय. सीबीआयची टीम आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटू शकते. सीबीआयचे अधिकारी रिया सोबत ड्रग्ज कनेक्शन संदर्भात चौकशी करत आहेत. यामध्ये बॉलिवुडमधील अनेक मोठी नाव आहेत ज्यांच्यासोबत रिया पार्टी करत असे. 
अमली पदार्थांसाठी थेट संपर्क करणे रिया टाळत असे. यासाठी नीरज, दीपेश, सॅम्युअल मिरांडा आणि केशव यांना सांगितलं जायचं.


#IAMSushant ट्रेंड


 'झी न्यूज'ने सुशांतला न्याय देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोहीम सुरु केलीय. यासाठी सोशल मीडियावर डिजीटल आंदोलन सुरुयं. रविवारी संध्याकाळी एका तासात १५० मिनिटांत #IAMSushant वर दीड लाखाहून अधिक ट्वीट झाले होते. परिणामी देशात हे देशभरात ट्वीटवर टॉपला राहीले.