मुंबई :  अभिनेत्री काव्या थापरला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत काव्या थापरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिच्या गाडीने दुसऱ्या गाडीला धडक दिली. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जे डब्ल्यू मॅरीड हाॅटेलजवळ हा अपघात घडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर पोलिसांचे निर्भया पथक घटनास्थळी दाखल झाले. 


त्यावेळी नशेत असलेल्या काव्या थापरने महिला पोलिसांशीही गैरवरवणूक करत त्यांना मारहाण केली.



या प्रकरणी काव्या थापर विरोधात जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे