`टोटल धमाल` सिनेमा पाकिस्तानमध्ये नाही होणार प्रदर्शित
भारतात एफडब्ल्यूआईसीई ने घेतलेल्या निर्णयानुसार निर्मात्यांना पाकिस्तानमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे.
मुंबई : इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'धमाल' सिरीजचा 'टोटल धमाल' हा तिसरा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिनेमाचा अभिनेता आणि निर्माता अजय देवगन याने घेतला आहे. भारतात एफडब्ल्यूआईसीई ने घेतलेल्या निर्णयानुसार निर्मात्यांना पाकिस्तानमध्ये सिनेमे प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे. पुलवामामध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 भारतीय सीआरपीएफ जवान शहीद झाले. अभिनेता अजय देवगन, अनिल कपूर, अभिनेत्री माधुरी दीक्षित स्टारर 'टोटल धमाल' सिनेमाच्या संपूर्ण टीमने जवानांच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत केली.
अभनेता रितेश देशमुखने पाकिस्तानमध्ये सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय ट्विटरच्या माध्यमातून कळवला आहे.
'टोटल धमाल' सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्यासोबत रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, आणि पीतोबाश हे कलाकार सिनेमात झळकणार आहे. सिनेमात कोबरा, वन्यप्रणी त्याचप्रमाणे वाघ सुद्धा दिसणार आहे.
सिनेमात चाहत्यांना 50 कोटी रुपयांचा गडबड घेटाळा अनुभवता येणार आहे. आणि 50 कोटी रुपयांच्या मागे सगळे पळताना दिसणार आहेत. अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित गुजराती कपल म्हणून चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. 'टोटल धमाल' सिनेमा 22 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.