मुंबई : पद्मावत चित्रपटात राणी पद्मिनीची भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदूकोणने पुरस्कार सोहळ्याला साडीत उपस्थिती लावली. या सोहळ्यात दीपिकाला 'इंडियाज मोस्ट स्टायलिश' (फिमेल) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


कोणाला मिळाले कोणते पुरस्कार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टाईल लेजेंड पुरस्कार दत्तला मिळाला. तर पुरस्कार सोहळ्यात शाहीद कपूर आपली पत्नी मीरा राजपूतसोबत दिसला. मीराने व्हाईट बॉडीकॉन गाऊन घातला होता.


ऐश्‍वर्या राय बच्‍चनला टाईमलेस स्टाईल दिवा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऐश्वर्या राय मित्र आणि डिझायनर मनीष मल्होत्रासोबत पोझ दिली.


'बरेली की बर्फी' ची अभिनेत्री कृती सेननला मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन पुरस्कार मिळाला. तर बिग बॉस ११ मध्ये झळकलेली टी.व्ही. अभिनेत्री हिना खानला मोस्ट स्टायलिश टी.व्ही. पर्सनेलिटीचा पुरस्कार मिळाला. 
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासारखा होता.


अमिताभ बच्चनला सुपरस्टार ऑफ स्टाईल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जीनत अमान यांच्या हस्ते मिळाला. आपल्या या सन्मानाचा फोटो बिग बी यांनी सोशल मी़डियावर शेअर केला.