मुंबई : ए एम सिनेमा आणि अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित 'गडकरी' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपुर्वी 'गडकरी' यांचा चेहरा समोर आला होता. नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित 'गडकरी' हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 'गडकरी'ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 


 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गडकरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कारकिर्दीवर आधारित 'गडकरी' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला होतं. 


नुकतेच गडकरी फिल्म्सच्या इन्स्टाग्राम पेजवरून 'गडकरी' चित्रपटाचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये राहुल चोपडा दिसत आहे. पोस्टरला कॅप्शन देण्यात आले आहे की, "जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे.''समाजहितासाठी प्रगतीचे आणि विकासाचे नवे मार्ग बनविणारे 'गडकरी ते रोडकरी.'सादर करीत आहोत, भारताचे केंद्रीय मंत्री 'श्री. नितीनजी गडकरी' यांच्या आजवरच्या कारकीर्दीवरील आधारित बहुचर्चित 'गडकरी' चित्रपटाचा हा उत्कंठावर्धक ट्रेलर !'गडकरी' २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत.#GadkariTrailer Out Now


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


'गडकरी' चित्रपटातील कलाकारांची माहिती गडकरी फिल्मच्या इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे. आगामी 'गडकरी' या चित्रपटात अभिनेत्री ऐश्वर्या डोर्ले कांचन गडकरीची भूमिका साकारणार आहे. वेदांत देशमुख या चित्रपटात श्रीपाद रिसालदार यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती काळकर, पुष्पक भट्ट यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'गडकरी' चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.