मुंबई : इरॉस नाऊ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओरिजनल रोमांचक, गुन्हेगारीवरील मानवी तस्करीवर आधारित 'फ्लेश' सीरिज प्रदर्शित करणार आहे. 'फ्लेश' सीरीज 21 ऑगस्टपासून इरोस नाऊवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फ्लेश' सीरीजचे 8 भाग असणार असून, या 8 रहस्यमय भागांसह, प्रत्येक भाग 40 मिनिटांचा असणार आहे. या सीरिजमधून स्वरा भास्कर, अक्षय ओबेरॉय, युधिष्टीर, विद्या माळवदे आणि महिमा मकवाना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजमधून मानवी तस्करीच्या भयानक वास्तवावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. कामगार, वेठबिगारी आणि शोषणासाठी लोकांची तस्करी हा जागतिक प्रश्न असून इथलं जग हे निराशा, संघर्षानी भरलेले आहे. इरॉस नाऊची ही 'फ्लेश' सीरिज डॅनिश असलम यांनी दिग्दर्शित केली असून, कथा पूजा लाधा सूरती यांनी लिहिली आहे. 



या सीरिजमध्ये अभिनेत्री स्वरा भास्कर एका पोलिस अधिकाऱ्याच्या  भूमिकेत दिसणार आहे. जी यातलं गूढ उकळण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावते. तिच्यासोबत अभिनेता अक्षय ओबेरॉयही जबरदस्त व्यक्तिरेखा साकारणार आहे.


मानव आणि बाल तस्करी, जगातील सर्वात भयानक वास्तवांपैकी एक असून आम्ही एका काल्पनिक कन्टेन्टद्वारे हा प्रश्न अधोरेखित करत आहोत. माझ्या कारकीर्दीत प्रथमच मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असून 'फ्लेश' सीरिजचा एक भाग असल्याचा अभिमान, असल्याचं स्वरा म्हणाली.


आम्ही नेहमीच आमच्या प्रेक्षकांना चांगला, अद्वितीय कन्टेन्टचा डिजिटल अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. 'फ्लेश' ही इरॉस नाऊची ओरिजिनल सीरिज असून यात तस्करी उघडकीस आणण्याच्या क्रूर प्रक्रियेच्या कथेसह दर्शकांना गुंतवून ठेवणारीही कथा आहे. या सीरिजमध्ये मानवी तस्करीचं भीषण वास्तव दाखवण्यात आलं असून नाट्य आणि थरार यांचा अनोखा अनुभव असल्याचं, इरॉस ग्रुपच्या मुख्य कन्टेन्ट अधिकारी रिधिमा लुल्ला यांनी सांगितलं.