मुंबई : वॉर्नर ब्रदर्सने आपला चित्रपट मोगलीचा ट्रेलर रिलीज केला आहे. मोगली हे लहान मुलांचं एक आवडतं पात्र आहे. यात जंगलात हरवलेला एक मुलगा आणि त्याची प्राण्यांशी मैत्री, या कथानकाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. यानंतर मोगली एका नव्या कहाणीसह प्रेक्षकांच्या समोर येत आहे. चित्रपटाची कहाणी ही जंगल बुकच्या पुढची कहाणी आहे. या चित्रपटातील मोगलीची भूमिका रोहन चंद साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलवरून तर स्पष्ट दिसतंय, कहाणी मोगलीच्या जिवंत राहण्याची संघर्ष कहाणी आहे.मागील चित्रपटासारखाच बघीरा, आणि बल्लू मोगलीला साथ देताना दिसणार आहे, या शिवाय चित्रपटात शेरखान देखील दिसणार आहे, तू मोगलीचा सर्वात मोठा शत्रू असणार आहे.