मुंबई : खिलाड़ी अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत 'केसरी' सिनेमाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आला. अक्षय पुन्हा चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ३ मिनीट ५ सेकंदांचा हा ट्रेलर यूट्यूबवर चांगलाच लोकप्रिय होत आहे. आता पर्यंत २ कोटी चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिला आहे. सिनेमात खिलाडी अक्षय कुमारसोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा झळकणार आहे. अनुराग सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला सिनेमा ऐतिहासिक कथेवर आधारलेला आहे. १८९७ साली झालेल्या सारगढीच्या लढाईत ब्रिटीश भारतीय सेनेच्या २१ शिख जवानांनी १० हजार अफगाणी सैनिकांशी झुंज दिली होती. या सिनेमाचं कथानक लढाईत सहभागी असलेले हवालदार ईशर सिंह यांच्या शौर्यावर आधारलेलं आहे. इतिहासातील सर्वात कठीण युद्धातील हे एक युद्ध होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 




'केसरी' सिनेमाचे कथालेखण गिरीश कोहली आणि अनुराग सिंग यांनी केले आहे. सिनेमाची निर्मिती अनेक निर्मात्यांनी मिळून केली आहे... त्यापैंकी एक करण जोहर आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेत. सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.