मुंबई : वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. तिचं चमकदार आयुष्य सोडल्यानंतर, ही प्रसिद्ध अभिनेत्री असं जीवन जगत आहे. ज्यामध्ये तिचा लूक पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही अभिनेत्री इतकी बदललेली आहे की तिला तुम्हाला ओळखणं कठीण होईल. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अनघा भोसले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलला पुर्ण लूक
अनघा भोसलेने टीव्ही जगताचा कायमचा निरोप घेतला. ज्याची घोषणा खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियावर केली होती. तेव्हापासून अभिनेत्री असे फोटो शेअर करत आहे ज्यामध्ये तिचा लूक पूर्णपणे बदललेला दिसत आहे.


पूलमध्ये दिसली अशा अवतारात
अनघा भोसलेने पूलमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री इतर अनेक लोकांसोबत मस्ती करताना दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री ग्लॅमरस लूकमध्ये दिसत नसून इतक्या साध्या लूकमध्ये दिसत आहे की, एक झलक पाहिल्यानंतर तुम्ही तिला ओळखू शकणार नाही.



पूलमधील हे फोटो शेअर करत अनघा भोसलेने कॅप्शनही लिहिलं आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'वसुधैव कुटुंबकम.. हा एक संस्कृत वाक्प्रचार आहे. याचा अर्थ जग एक कुटुंब आहे. हरी बोल, आपण सर्व आत्मा आहोत. परम भगवान श्रीकृष्णाचे अंश आणि अंश. आपण सगळी त्याची मुलं आहोत. म्हणून सगळे जिवीत आत्माल्या प्रेम आणि करुणा नेहमी राहिली पाहिजे.