`लॉकअप`मधील ट्रान्सजेंडर साईशा शिंदे या कैद्याच्या प्रेमात, पाहून सगळेच हादरले
सारा खानशी बोलताना सायशा म्हणते, मला त्याच्यासाठी काहीतरी वाटत आहे,
मुंबई : कंगना रानौतचा शो लॉकअप सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. पहिल्या आठवड्यानंतर ही लॉकअप शो लाखो व्ह्यूज मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
दररोजच्या एपिसोडमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे, अलीकडच्या एपिसोडमध्ये साईशा शिंदे, पूनम पांडे आणि पायल रोहतगी यांनी जुने काही किस्से या शोमध्ये सांगितले आहेत.
त्याचवेळी, आताच्या एपिसोडमध्ये साईशा शिंदेने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. सायशा शिंदे म्हणाली, मुनव्वर फारुकीबद्दल तिला काहीतरी वाटू लागले आहे.
लॉकअपच्या शोमध्ये एका टास्कदरम्यान सायशा शिंदे भावूक झाली. सारा खान तिथे पोहोचल्यावर ती रडायला लागते.
सारा खानशी बोलताना सायशा म्हणते, मला त्याच्यासाठी काहीतरी वाटत आहे, मी जर त्याला लक्षात ठेवून कोणताही निर्णय घेतला तर त्यात माझी चूक नाही. यानंतर सायशा म्हणते. मला माहित आहे हा विचार फक्त मी करत आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी विचार होणार नाही.