Anushka Sharma and Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) हे दोघे सोशल मीडियावर (Social media) सक्रीय असतात. या दोघांचं सोशल मीडिया अकाऊंट म्हणजे यांच्या प्रेमाची साक्ष...अनुष्का असो वा विराट हे दोघेही एकमेकांबद्दल प्रेम (Love) व्यक्त करण्याचा एकही चॉन्स सोडत नाही. अनुष्का आणि विराटची जोडी चाहत्यांना खूप आवडते. या दोघांमधील नवरा-बायकोचं (husband and wife) नातं हे सोशल मीडियावर अनेकांना प्रेरणा देतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण गेल्या काही दिवसांपासून अनिष्का थोडी उदास (sombre)आहे. कारणही तसंच आहे, अनुष्का विराटमुळे भावूक (Emotional) झाली असून तिने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट (Emotional post) लिहिली आहे. (Treading news Anushka Sharma gets emotional because of Virat Kohli nm)


झालं असं की, सध्या अनुष्का यूकेमध्ये (UK) असून 'चकडा एक्सप्रेस'(CHAKDA XPRESS) या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये (shooting) व्यस्त आहेत. या चित्रपटात ती भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami) भूमिकेत दिसणार आहे.अशातच अनुष्का पती विराटच्या आठवणीत भावूक झाली आहे. तिने विराटबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


 #MissingHubby too much...


अनुष्काने विराटसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ''जग अधिक उजळ, रोमांचक, अधिक मजेदार आणि एकूणच सारं जग सुंदर दिसतं जेव्हा बायो-बबलमधील हॉटेलमध्ये या व्यक्तीसोबत राहिल्यावर खूपच चांगलं वाटतं.''


अनुष्का शर्माच्या या पोस्टवर चाहते आणि इंडस्ट्रीमधील मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी  (Heart emoji) पाठवले आहेत. या पोस्टला आतापर्यंत 16 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याची ही पोस्ट चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल  (viral) होत आहे.



पंजाबमध्ये विराट कोहली


विराट कोहली सध्या मोहाली (Mohali), पंजाबमध्ये (Punjab) आहे. तो मंगळवार (tuesday), 20 सप्टेंबर 2022 ला होणार्‍या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पहिल्या T20 सामन्याची तयारी करत आहे.