Celebrities Lucky Charm: आपण प्रत्येक जण आयुष्यात खूप मेहनत करत असतो पण तरीही देखील आपल्याला यश मिळतं नाही. अशावेळी आपण ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय करतो.  अनेकांना आयुष्यात असा पण अनुभव येतो की, एखादी गोष्ट केली तर ती आपल्याला लकी (Lucky) ठरते. तुम्ही अनेक वेळा खास करुन खेळाडूंबाबत ऐकलं असेल की, या नंबरचा टीशर्ट लकी ठरतो. तर खिशात लाल रुमाल ठेवला की मी मॅचमध्ये चांगले प्रदर्शन दिलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच काहीसा विश्वास बॉलीवूडमधील बीग सेलिब्रिटींमध्येही दिसून येतो. आज आपण सलमानपासून अमिताभ बच्चनपर्यंत हे कुठल्या गोष्टीला आपला लकी चार्म्स (lucky charms)मानतात ते जाणून घेऊयात.  (treading news celebrities who believe in lucky charm entertainment gossips)


अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 


सगळ्यात पहिले आपण अमिताभ बच्चन यांच्या लकी चार्म्सबद्दल जाणून घेऊयात. तुम्ही पाहिलं असेल की अमिताभ बच्चन यांच्या हातातील बोटाच नीलमची अंगठी आहे. ही अंगठी घातल्यानंतर त्याच्या करिअरमध्ये बरीच प्रगती झाल्याचं बिग बींचं मान आहे. 


रणबीर कपूर (Ranbir kapoor)


रणबीर कपूर आपला लकी नंबर 8 मानतो. अभिनेत्याने आपल्या कारच्या नंबर प्लेटवर आणि जर्सीवरही 8 नंबर लिहिला आहे. इतकंच नाही तर रणबीरची पत्नी आलियाच्या हातावर 8 नंबर लिहिला होता.


कतरिना कैफ (Katrina Kaif) 


कतरिना कैफ तुम्हाला कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अजमेर शरीफ दर्ग्याला जाते. कतरिनाचे दर्ग्याचे फोटो आणि व्हिडीओच तुम्ही पाहिले आहात. कारण कतरिना अजमेर शरीफ दर्ग्याला मानते. 


शाहरुख खान (Shah Rukh Khan)


शाहरुख खान आपल्या आयुष्यातील 555 नंबरला भाग्यवान मानतो. किंग खान त्याच्या सर्व वाहनांचा क्रमांक 555 ठेवतो.


दीपिका पदुकोण (Deepika Padukone) 


दीपिका पदुकोण गणपती बाप्पाला खूप मानते. कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाण्यास अभिनेत्री विसरत नाही.


काजोल (Kajol) 


काजोल  हिऱ्याच्या ओम अंगठीला भाग्यवान मानते. तिला ही अंगठी पती अजय देवगणने भेट दिली होती. अभिनेत्रीचा असा विश्वास आहे की, यामुळे तिला खूप शांतता मिळते.


विद्या बालन (VIDYA BALAN) 


विद्या बालन पाकिस्तानच्या हाश्मी काजलला भाग्यवान मानते. हाश्मी काजल आणि मण्यांनी बनवलेल्या ब्रेसलेटमुळे तिचे वैयक्तिक आयुष्य सुधारलं आहे, असं अभिनेत्रीचं माननं आहे. 


रणवीर सिंग (ranveer singh)


रणवीर सिंग काळ्या धाग्याला आपला लकी चार्म मानतो. हा धागा त्याच्या आईने घातला होता. अभिनेते हा धागा त्यांच्या सरळ पायात घालतो.


सलमान खान (Salman Khan) 


वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी सलमान खान फिरोजा दगडापासून बनवलेले ब्रेसलेट घालतो. हे ब्रेसलेट अभिनेत्याला त्याचे वडील सलीम खान यांनी दिले होते.