मुंबई : 'बकेट लिस्ट' या मराठी सिनेमांतून बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींची एक लोकप्रिय जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1994 च्या 'हम आपके है कोन' या सिनेमांतून रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित या दोघींनी प्रेक्षकांच भरपूर मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा या आठवणी जाग्या झाल्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणेचा एक व्हिडिओ ट्रेंडिग आहे. आणि आपल्याला हे गाणं सांगण्याची गरज नाही कारण हे गाणं आहे 'हम आपके है कोन' या सिनेमांतील 'लो चली मै...' 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिल्ममेकर करण जोहर माधुरी दीक्षितचा 'बकेट लिस्ट' हा सिनेमा प्रदर्शित करत आहे. या सिनेमाच्या शुटिंग वेळीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत या दोन्ही अभिनेत्रींनी गाण्यावर ठेका धरला आहे. आणि आश्चर्य वाटेल पण अजूनही या दोघींची डान्स बघताना प्रत्येकजण त्या आठवणीत रमलं हे नक्की. 



तब्बल 24 वर्षांनतर या दोघी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत. माधुरी दीक्षित बकेट लिस्टच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे. हा सिनेमा 25 मे रोजी प्रदर्शित होत आहे.