Ranveer Singh: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) त्याच्या अतरंगी अंदाजमुळे कायम चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या न्यूड फोटोशूटमुळे तुफान चर्चेत आहे. रणवीर सिंगचा हा न्यूड (Nude photoshoot) फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता तो सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे. यंदा पोलीस स्टेशनमध्ये दिसून आला आणि तिथे तो जवळपास 2 ते  2.30 तास तिथे होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे रणवीर सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. पण थांबा आम्ही सांगतो तुम्हाला नेमकं काय प्रकरण घडलं ते. तर तुम्हाला तो रणवीरचा न्यूड फोटो आठवतो. हो तोच फोटो, या फोटोशूटमुळे रणवीर सिंग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याचा या फोटोशूटमुळे रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (trending news actor ranveer singh will be arrested by the police and  nude photoshoot case what the matter)


त्यामुळे आज अखरे चेंबूर पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूट प्रकरणी (Nude photoshoot controversy) जवाब नोंदवला आहे. रणवीर सिंग सकाळी 7.30 वाजता चेंबूर पोलीस ठाण्यात जाऊन त्याने जवाब नोंदवला. सुमारे 2 ते 2.30 तास पोलिसांनी रणवीरचं जवाब नोंदवला गेला. या प्रकरणी पोलिसांनी रणवीरला दोनदा समन्स पाठवले होते, मात्र आज सकाळी रणवीर अखेर आपली बाजू मांडली. 



यादरम्यान पोलिसांनी रणवीरला अनेक प्रश्न विचारले, जसे की न्यूड फोटोशूटसाठी कोणत्या कंपनीशी करार झाला होता. फोटोशूट कधी आणि कुठे केले? तुम्हाला माहीत आहे का की अशा प्रकारच्या शूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात? असे अनेक प्रश्न रणवीरला विचारण्यात आले. 


पेपर मॅगझिनसाठी अभिनेत्याच्या व्हायरल फोटो गेल्या महिन्याच्या अखेरीस इंटरनेटवर खळबळ उडवून दिली होती. रणवीरच्या या फोटोची जेवढं कौतुक झालं होतं, तेवढं या फोटोवरुन रणवीर ट्रोल झाला होता. हे फोटोशूट 70 च्या दशकातील पॉप आयकॉन बर्ट रेनॉल्ड्स यांना श्रद्धांजली होती, जे कॉस्मोपॉलिटन मासिकासाठी 1972 च्या शूटमध्ये देखील नग्न झाले होते. 


दरम्यान रणवीर सिंगविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, आयटी कायद्याच्या कलम 67अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.