ट्रिपल तलाकवर काय बोलले `बॉलिवूड`कर?
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ट्रिपल तलाकच्या मुद्यावर ऐतिहासिक निर्णय सुनावला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ट्रिपल तलाकच्या मुद्यावर ऐतिहासिक निर्णय सुनावला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली.
ट्विटरवर शबाना आजमींसोबत अनुपम खेर आणि मधुर भंडारकर यांनी ट्विट करून आपली मत नोंदवली आहे. आपल्याला माहितच आहेत की, बॉलिवूड क्षेत्रातील ही सर्वात मोठी आणि दिग्गज मंडळी. यांची नेमकी काय मतं आहेत जाणून घेऊया...
शबाना आजमी यांनी सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मी ट्रिपल तलाक मुद्यावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करतेय. अशा शब्दात त्यांनी कौतुक केलं आहे. तसेच त्या ४ बहादुर महिलांचं देखील कौतुक केलं आहे. ज्यांनी अनेक वर्ष याच्या विरोधात लढा दिला आहे.
त्यासोबतच मधुर भंडारकर यांनी देखील सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
तसेच सुप्रीम कोर्टात या प्रकरणाच्या शायरा बानो, आफरी रहमान, गुलशन परवीन, इशरत जहा आणि अतिया साबरी यांनी केलेल्या अपीलनंतर हे सुरू झालं होतं. सगळ्यांकडून ट्रिपल तलाकबरोबरच लग्न, हलाला आणि बहुविवाह या मुद्द्यांवर देखील याचिका जाहीर झाली होती. मात्र कोर्टाने सांगितलं होतं की, आम्ही फक्त ट्रिपल तलाकरवर निर्णय देऊ.