Tripti Dimri Trolled: तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. तिचे अनेक चित्रपट रिलीज होत आहेत. 'अॅनिमल'नंतर तृप्ती डिमरी नवीन क्रश बनली आहे. 'बॅड न्यूज'नंतर आता तृप्ती डिमरी 'विक्की और विद्या का वो वाला व्हिडीओ'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. या चित्रपटातील 'मेरे मेहबूब' गाण्यावरील तृप्ती डिमरीचा डान्स खूप व्हायरल होत आहे. त्यावरून तिला ट्रोल देखील केलं जात आहे. गाण्यातील तृप्ती डिमरीच्या स्टेप्स चाहत्यांना आवडल्या नाहीत. लोक तिच्या या डान्स स्टेपला अश्लील म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'विक्की और विद्या का वो वाला व्हिडीओ'चा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे. हा चित्रपट कॉमेडीने परिपूर्ण असणार आहे. या चित्रपटातील 'मेरे मेहबूब' हे गाण गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलं आहे. या गाण्यातील तिच्या स्टेप पाहून चाहते तिला ट्रोल करत आहेत. 


तृप्ती डिमरीला का ट्रोल करत आहेत लोक? 


'मेरे मेहबूब' या गाण्यामध्ये तृप्ती डिमरी जमिनीवर झोपून स्टेप्स करत आहे. तिची ही स्टेप्स प्रेक्षकांना अजिबात आवडलेली नाहीये. तृप्ती डिमरीसोबतच गाण्याचे कोरिओग्राफरलाही प्रेक्षक ट्रोल करत आहेत. चाहत्यांनी तिच्या या डान्स व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटलं आहे की, मी हे कसे पहावे? तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, जय हो गणेश. तृप्ती डिमरीसोबत या गाण्याच्या कोरिओग्राफरला देखील ट्रोल केलं जात आहे. सध्या तिच्या या डान्सची देखील सर्वत्र चर्चा सुरु आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या चित्रपटात तृप्ती डिमरी आणि राजकुमार पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट 11 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या राजकुमार राव त्याच्या 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. सध्या अभिनेत्याकडे अनेक चित्रपट आहेत.