Tripti Dimri Will Play Parveen Babi In Her Biopic : 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री तृप्ती डिमरीची लोकप्रियता ही खूप जास्त वाढली आहे. तिला एकामागे एक चित्रपट मिळू लागले आहेत. या चित्रपटानंतर तिच्याकडे 3 चित्रपट आले आहेत. त्यापैकी एक 'बॅड न्यूज' आहे. जो आताच प्रदर्शित झाला आहे. तर त्याशिवाय 'भूलभूलैया 3' आहे. रिपोर्ट्सनुसार, तिच्याकडे असलेला तिसरा चित्रपट हा एक बायोपिक आहे. ही बायोपिक कोण्या दुसऱ्याची नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री परवीन बाबी यांची आहे. त्या अचानक गायब झाल्या होत्या. त्यांच्या आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आजही सुरुच असतात. इतकंच नाही तर त्यांच्या शेवटच्या क्षणात त्यांना पाणी विचारायला देखील कोणी नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सविषयी बोलायचे झाले तर तृप्ती डिमरीला परवीन बाबी यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं आहे. तिच्या आजवरच्या चित्रपटांमध्ये तिनं वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत. दरम्यान, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती ही समोर आली नाही. इतकंच नाही तर चित्रपटातील इतर कलाकारांसोबत प्रोडक्शनची देखील घोषणा करण्यात आलेली नाही.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मॉडेलिंगनं केली करिअरची सुरुवात


परवीन बाबी यांचा जन्म 4 एप्रिल 1949 रोजी जूनागढ, गुजरात येथे झाला होता. परवीन यांचा जन्म त्यांच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या 14 वर्षानंतर झाला होता. जेव्हा त्या 6 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी अहमदाबादमध्ये शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर परवीन यांनी 1972 मध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली आणि 1973 मध्ये 'चरित्र' या चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण परवीन यांनी त्यांच्या अभिनयानं सगळ्यांच्या मनावर छाप सोडली. अमिताभ बच्चन यांच्या 'दीवार' मधू लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा : Samantha सोबत घटस्फोटानंतर Naga Chaitanya -शोभितासोबत करणार साखरपुडा! नागार्जुन करणार लग्नाची घोषणा


परवीन यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होत्या. Danny Denzongpa यांच्या सोबत त्या चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होत्या आणि त्यानंतर त्या कबीर बेदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यांनी 1983 ला भारत सोडलं आणि 1989 पर्यंत आध्यात्मिक यात्रा केली. त्यावेळी असा दावा करण्यात येतो की त्यांना schizophrenia हा गंभीर मानसिक आजार झाला होता. त्यांनी इंडस्ट्रीनं त्यांच्याविरोधात कट रचल्याचे आणि तिची खराब होण्याचा खुलासा केला होता. 22 जानेवारी 2005 ला त्यांच्या फ्लॅटमध्ये त्या मृत अवस्थेत दिसल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. तर वयाच्या 55 व्या वर्षी परवीन यांनी अखेरचा श्वास घेतला.