Naga Chaitanya Engagement to Shobhita Dhulipala : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या. आता चर्चा आहे की 8 ऑगस्ट रोजी म्हणजे आज त्यांचा साखरपुडा आहे. नागा चैतन्यच्या घरीच त्याचा आणि शोभिता धुलिपालाचा साखरपुडा होणार आहे. खरंतर, त्यांच्या कुटुंबानं किंवा त्या दोन्ही कलाकारांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सुत्रांनुसार ही बातमी खरं असल्याचं म्हटलं जात आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या साखरपुड्याची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. अनेकांनी या बातमीवर आनंद व्यक्त केला आहे तर समांथाच्या चाहत्यांनी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाला ट्रोल करणं सुरु केलं आहे. नागा चैतन्यनं समांथा रुथ प्रभूशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. तर 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनी 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या Ye Maaya Chesave या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्यांचा डेब्यू चित्रपट होता. ही माहिती द ग्रेट आंध्रानं दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या नात्याला त्याचे वडील नागार्जुन चैतन्य यांनी परवानगी दिल्याचं म्हटलं जात आहे.
एकीकडे समांथा अजूनही सिंगल आहे तर दुसरीकडे नागा चैतन्य हा बऱ्याच काळापासून शोभिता धुलिपालासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांनी अजून त्यांच्या नात्यावर काही वक्तव्य केलेलं नाही, पण एकत्र ते दोघं स्पॉट देखील झाले आहेत. त्या दोघांना अनेकदा लंडनमध्ये लंच डेटवर स्पॉट करण्यात आले. पण शोभिता धुलिपालानं 2023 मध्ये नागा चैतन्यसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर सांगितलं की जेव्हा ती काही चुकीचं करत नाही आहे, तर तिला कोणालाही काही स्पष्ट करण्याची गरज नाही.
हेही वाचा : किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले! नेहा धुपिया म्हणाली, 'मी विवाहित...'
'ग्रेट आंध्रा' च्या रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. तर आज 8 ऑगस्ट रोजी त्यांचा साखरपुडा आहे. साखरपुड्यानंतर ते त्यांच्या चाहत्यांना ही गूड न्यूज देणार आहेत. त्याशिवाय अशी देखील माहिती आहे की त्या दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर नागार्जुन नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची घोषणा करणार आहेत.