किसिंग सीन्स, मारहाणीची दृष्ट असलेल्या रक्तरंजित `ॲनिमल`ची स्तुती दाक्षिणात्य अभिनेत्रीला भोवली
Trisha Krishnan trolled : तृषा कृष्णनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सोशल मीडियावर एकच खळबळ, नेटकऱ्यांनी ट्रोल करताच तृषानं डिलीट केली पोस्ट
Trisha Krishnan trolled : दाक्षिणात्य अभिनेत्री तृष्णा कृष्णन ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सगळ्यात आधी तिचं चर्चेत येण्याचं कारण हे म्यूजिक कंपोजर मंसूल अली खान यांच्यासोबत असलेला वाद होता. त्यांचा वाद चर्चेचा विषय ठरला होता. खरंतर हे प्रकरण शांत झालं आणि दुसरीकडे तृषा आणखी एका वादात अडकली आहे. तृषाला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या ट्रोलिंगनंतर तिनं रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' साठी लिहिलेली पोस्ट डिलीट केली आहे.
तृषानं संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटाची स्तुती करत इन्स्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट शेअर केली होती. त्यात ती चित्रपटाला कल्ट मूव्ही असं म्हणाली. त्यानंतर होत असलेल्या ट्रोलिंगला पाहता, तिनं ही पोस्ट डिलीट केली आहे. चला जाणून घेऊया काय म्हणाली होती तृषा. तृषानं तिच्या स्टोरीवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. हे पोस्टर शेअर करत तिनं कॅप्शन दिलं की फक्त एकच शब्द आहे आणि तो म्हणजे कल्ट. त्याशिवाय तिनं टाळ्या वाजवणारे इमोटिकॉन वापरले. काही वेळात तृषानं ही पोस्ट डिलीट केली. त्या आधीच तृषाच्या या स्टोरीचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते.
नेटकऱ्यांनी तृषानं केलेल्या या पोस्टला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. इतकंच नाही तर त्यावरून तिला खूप काही सुनावलं आहे. तर तिच्या काही चाहत्यांनी तिला पाठिंबा दिला आहे. ट्रोल करत एक नेटकरी म्हणाला की 'एक आठवड्याआधी हिच स्त्री सन्मानाविषयी शिकवत होती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीकडून कोणत्याही चित्रपटाचा निगेटिव्ह रिव्ह्यू येईल ही अपेक्षा नाही. यांच्याकडे स्वत: चं खरं ओपिनियन नसतं (याचा अर्थ त्यांना खरं तो चित्रपट बघून काय वाटलं हे ते सांगत नाहीत) कारण त्यांना या इंडस्ट्रीत रहायचं आहे.' तर काही नेटकऱ्यांनी तृषाचे मिम्स बनवत ते शेअर केले आहे.
हेही वाचा : Animal WBOC : 'ॲनिमल'नं जगभरात रचला इतिहास, पाहा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर किती झाली कमाई
'ॲनिमल' मध्ये अनेक हिंसक सीन्स आहेत. त्यामुळे या चित्रपटाला A सर्टिफिकेट देण्यात आलं आहे. सेंसर बोर्डानं अडल्ट सर्टिफिकेट देण्यासोबतच चित्रपटातील चार ते पाच सीन काढून टाकण्यात आले आहेत. वडील आणि मुलामध्ये असलेल्या नात्यावर बनवण्यात आलेल्या या चित्रपटाची स्तुती होत असली तरी दुसरीकडे चित्रपटातील हिंसक सीन्सचा विरोध होत आहे. दरम्यान, या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी देखील होत्या. या चित्रपटानं जबरदस्त कमाई केली असून पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार, ग्रॉस वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन हे 340 कोटींचं झालं आहे.