गंभीर! घटस्फोटानंतर आता, समंथावर कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप
समंथासमोरच्या अडचणी वाढल्या..
मुंबई : अभिनेता नागा चैतन्य याच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केल्या क्षणापासून अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यावर चाहत्यांच्या एका वर्गानं टिकेची झोड उठवली आहे. सोशल मीडियावर तर या घटस्फोटाकडे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणूनच पाहिलं जात आहे.
नेटकरी ज्या पद्धतीनं या प्रकरणावर व्यक्त होत आहेत हे पाहता असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. (Samatha ruth prabhu)
खासगी जीवनात आलेल्या या वळणाला मागे टाकत समंथा बरीच पुढे चालू लागली आहे. आपल्या कारकिर्दीवर ती लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे.
असं असलं तरीही तिच्या वाटेवर असणाऱ्या अडचणी आणि कटू बोल काही केल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीत.
Oo Antava या आयटम साँगमुळं एकिकडे समंथाच्या बोल्ड लूकवर सर्वांच्याच नजरा खिळत असताना दुसरीकडे तिला सोशल मीडिया युजर्सच्या अवहेलनाजनक कमेंट्सचाही सामना करावा लागत आहे.
काहींनी सर्व मर्यादा ओलांडत समंथाला, 'divorced second hand item' म्हटलं आहे.
इतक्यावरच न थांबता एका चांगल्या पुरुषाकडून म्हणजे नागा चैतन्य याच्याकडून तब्बल 50 कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोपही तिच्यावर हे नेटकरी करत आहेत.
इथं लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की समंथानं तिच्यावर निशाणा साधणाऱ्या या ट्विटची दखल घेत त्याला उत्तरही दिलं आहे.
'देव तुझं भलं करो...' इतक्या सरळ आणि सोप्या शब्दांत तिनं या युजरला उत्तर दिलं.
समंथानं दिलेलं हे उत्तर सध्या सर्वांच्याच भुवया उंचावत आहे.
मुळात कलाकारांच्या वैयक्तित आयुष्यातील अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. पण, त्यातीच कोणत्याही गोष्टीवर व्यक्त होण्याच्याही मर्यादा असतात.
आपल्या याच मर्यादा ओळखून चाहत्यांनी, सोशल मीडिया युजर्सनी व्यक्त व्हावं हीच अपेक्षा कलाकारांकडून केली जाते.
असं न झाल्यास चाहते आणि कलाकारांमधील अंतर अवाजवी वाढत गेल्याचंही चित्र पाहायला मिळतं.