मुंबई : आमीर खान आपल्या कामामुळे अतिशय लोकप्रिय आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट असलेला हा अमीर खान सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नसतो. पण आता आमीर खान आपल्या फॅमिलीसोबत व्हॅकेशन मोडवर असल्याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पण याच फोटोमुळे सध्या आमीर खानवर भरपूर टीका होत आहे. आमीर खानने आपल्या फेसबुक अकाऊंटवर मुलगी इरासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे सध्या तो ट्रोल होत असून त्यावर गंभीर टीका होत आहेत. या फोटोत नेमके काय आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या फोटोत आमीर आणि इरा मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. दोघेही पार्कमध्ये खेळत आहेत. पण सोशल मीडियावरच्या काही युझर्सना आमीर - इराचा फोटो जराही रूचला नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात असा फोटो शेअर करणे गैर असल्याचं देखील युझर्स म्हणाले. अनेक युझर्सनी या फोटोवर टीका केली आहे. ‘कुछ तो खौफ खाओ अल्लाह का़ मैं तुम्हारा सन्मान करता हू. लेकीन यह अस्वीकार है,’ असे एका युजरने लिहिले आहे. अनेक युजरने आमिरवर टीका करत रमजानच्या महिन्यात योग्य कपडे घातले पाहिजेत, असा सल्ला दिला आहे. युजर्सचा हा सल्ला विशेषत: इरासाठी आहे. अर्थात यात अनेक आमिर व इराची बाजू घेणारेही युजर्स आहेत.


आमीर खान सध्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 1939 साली आलेल्या 'कन्फेशन्स ऑफ ए ठग' या कांदबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. आमीर खान या सिनेमांत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.