मुंबई : अभिनेत्री-लेखिका-निर्माता ट्विंकल खन्ना ही आपले सोशल मीडियावर ठामपणे मांडत असते. त्यामुळे अनेकदा तिला टिकेला समोरे जावे लागते. तर बरेचदा ती ट्रोर्ल्सच्या निशाण्यावर असते. पण या ट्रोर्ल्सबद्दल बोलताना ट्विंकल खन्ना हिने एक विधान केले. ट्रोर्ल्स हे झुरळांप्रमाणे असतात, असे ट्विंकल ओएसएम अवॉर्ड्समध्ये आयोजित सोशल मीडिया ट्रोलिंग ऑन सोशल प्लेटफॉर्म्सच्या पॅनल चर्चेत म्हणाली. 


ट्विंकल खन्ना म्हणाली की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती म्हणाली की, हे लोक कोणाही सोबत असे वागतात. जे लोक टोर्ल्संना गंभीरपणे घेतात ते मुर्ख आहेत, असे मी म्हणेन. कारण ट्रोर्ल्स हे झुरळांप्रमाणे असतात. ज्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर हिट स्प्रे मारून बाजूला होता आणि आपल्या कामाला लागता. तसेच ट्रोर्ल्सचे असते. मी नेहमी माझ्यावर झालेल्या टिकेवर लक्ष ठेवते. त्यांचे मूल्यांकन करते. काही गोष्टी मला योग्य वाटतात आणि यामुळेच मला जगातील लोकांची मते कळतात. 


या मान्यवरांची उपस्थिती


ट्विंकल खन्ना, गुल पनाग, जोस केवाको, मालिनी अग्रवाल आणि तन्मय भट्ट यांच्यासारखे प्रतिष्ठीत व्यक्तींनी या चर्चासत्र सहभाग घेतला होता.